कराडमधील ऐश्वर्या भरत पाटणकर यांनी आपल्या कुटुंबासह वारली आदिवासी संस्कृतीवर आधारित गणेश सजावट साकारली आहे. निसर्गातून मिळणारे रंग वापरून काढलेली चित्रे वारली जमातीच्या जीवनप्रसंगांना उजाळा देतात. पर्यावरणपूरक साहित्य वापरून तयार केलेली ही पारंपरिक सजावट गणेशभक्तांसाठी आकर्षण ठरत असून कराड परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे.