भगवान शंकर आणि माता पार्वती यांचे ज्येष्ठ पुत्र
आणि आपल्या लाडक्या बाप्पांचे ज्येष्ठ बंधू म्हणून
कार्तिकेयला ओळखले जाते…
कार्तिकेय हे अधीर आणि क्षुद्र स्वभावाचे होते…
गणपती बाप्पा आणि भगवान कार्तिकेय या दोघांचेही
स्वभाव आणि शारीरिक गुण वेगवेगळे होते..,
म्हणून दोन्ही भावंडांमध्ये नेहमी भांडण होत असे..,
एकेदिवशी गणपती बाप्पा आणि कार्तिकेय यांच्यात
बुद्धी आणि शक्ती या विषयावरून मोठा गंभीर वाद झाला…
त्यामुळे न्याय मिळवण्यासाठी त्यांनी
भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला
दोघेही तिथे गेल्यानंतर त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर
माता पार्वती आणि भगवान शंकर यांनी सांगितले कि,
दोन्ही भावांपैकी जो प्रथम पृथ्वीला म्हणजेच
संपूर्ण विश्वाला प्रदक्षिणा घालण्याची शर्यत पूर्ण करेल तो विजेता ठरेल
माता पित्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर भगवान कार्तिकेय
त्यांच्या वाहनावर म्हणजेच मोरावर बसून ते शर्यत जिंकण्यासाठी निघाले….
परंतु गणपती बाप्पांनी एक युक्ती लढवली..
त्यांनी आपल्या माता आणि पित्यांना म्हणजेच
भगवान शंकर आणि माता पार्वतीला प्रदक्षिणा मारण्यास सुरुवात केली.
यावर भगवान शंकर आणि माता पार्वती आश्चर्यचकित झाले..
पार्वती माता गणपती बाप्पांना म्हणाल्या…
“अरे बाळा, तुझा भाऊ कितीतरी पुढे पोहोचला असेल,
आणि तू इथेच…? ”
यावर गणपती बाप्पा म्हणाले,
तुम्ही दोघेही माझे जग आहात,
तुमच्याभोवती प्रदक्षिणा मारली म्हणजे
अखंड विश्वाला प्रदक्षिणा मारल्यासारखे आहे.
हे ऐकून भगवान शंकर आणि माता पार्वती यांना
गणपती बाप्पांचे फार कौतुक वाटले, त्यांनी
गणपती बाप्पांना बुद्धिमान असल्याचे सांगत
या शर्यतीचा विजेता बाप्पांना घोषित केले…..
या कथेतून माता पित्यांबद्दल असलेली निष्ठा दर्शवतो…
पुढील भागात पाहूया …………
बाप्पा आणि मोदक – एक गोड कथा