पुण्यातील गाजलेल्या खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकरांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याकडून अद्याप जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, खेवलकरांचे वकील संपूर्ण FIR रद्द करण्यासाठी थेट हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. जामीनासाठी अर्ज न करता थेट FIRच रद्द करावा यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात एक नवे वळण आले असून, पुढील काही दिवसांत हायकोर्टातील हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.