नवी मुंबईच्या खारघर येथील श्री. सत्य साई संजीवनी रुग्णालयात 619 बाल रुग्णांवर यशस्वी हृदय विकार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. रोटरी क्लब ऑफ मुंबई एअरपोर्टच्या नेतृत्वाखाली ‘गिफ्ट ऑफ लाईफ’ प्रकल्पांतर्गत 10 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला होता. या यशस्वी शस्त्रक्रिया नंतर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी रुग्णालयात उपस्थित राहून टीमचे कौतुक केले आणि भविष्यतही जास्तीत जास्त बालकांवर उपचार होण्यासाठी समर्थन दर्शवले.