राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी मानहानीचा दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांच्यावर विधानभवनात पत्ते खेळतानाचा व्हिडीओ जगजाहीर केल्या प्रकरणी रोहित पवार यांच्यावर मानहानीचा दावा करण्यात आला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली. यावर रोहित पवार यांनी तुमचा काळ आला होता, पण वेळ नाही, त्यामुळे तुम्ही मोठे कांड करून देखील वाचलात, मानहानीचे एवढी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाने केले कशाला..? असा प्रश्न त्यांनी विचारला