कोकणात गणेशोत्सवासाठी कोकणवासीय लाखोंच्या संख्येने दाखल झाले आहेत. आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी आपल्या गावी जायला मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. लांजा बस स्थानकात कोकणवासीयांची मोठी गर्दी झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन देखील चोख बंदोबस्त ठेवून आहे. गावी जाण्यासाठी कोकणवासीय अधिकाधिक एसटीला पसंती देताना दिसून येत आहेत.