‘लाडकी बहीण’ योजनेच्या यशानंतर शिवसेना शिंदे गटाने ‘लाडकी सुनबाई योजना’ सुरू केली आहे. अन्याय, छळ किंवा अत्याचार झाल्यास विवाहित महिलांना मदतीसाठी खास हेल्पलाइन उपलब्ध होणार असून, प्रत्येक शिवसेना शाखेतून थेट सहाय्य दिले जाणार आहे. राज्यभर मोहिम राबवली जाणार असून, सासू-सुनांच्या चांगल्या नातेसंबंधांनाही गौरविण्यात येईल. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे या योजनेच्या राज्य संयोजकपदी नियुक्त झाल्या आहेत.