राज्यात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रमध्ये बैलगाडा शर्यती गाजवणाऱ्या लखनची आज पोळ्याच्या निमित्ताने ग्रँड एंट्री झाली. दोन वर्षात दीडशे बैलगाडा शर्यती मध्ये तब्बल सत्तर लाखांचे बक्षीस लखनने मिळवले. लखन हा तीन वेळा हिंदकेसरी ठरला आहे. महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यती आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या लखनचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी