बीडच्या आष्टी तालुक्यातील चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात 111 फुटी तिरंगा ध्वजारोहण कऱण्यात आले. धो-धो पावसात असूनही मोठ्या उत्साहात चिखली ग्रामस्थांच्या वतीने तिरंगा ध्वजारोहण संपन्न झाले. भारत माता की जय आणि जय जवान,जय किसान या घोषणांनी चिखली परिसर दणाणून निघाला.












