छत्रपती संभाजीनगरमध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपानावर पोलिसांची मोठी कारवाई. परिमंडळ दोनचे उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या आदेशानुसार, एका दिवसात 94 मद्यपींना अटक करून विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती मिळाली असून, स्थानिकांनी कारवाई कायम ठेवण्याची मागणी केली आहे.












