ओडिशातील चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवरून मध्यम पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. या प्रक्षेपणाद्वारे सर्व तांत्रिक व कार्यात्मक मापदंडांची पुष्टी झाली. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली.












