समुद्राला शांत करण्यासाठी नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. नारळी पौर्णिमा या सणाला विशेषतः नारळ समुद्राला अर्पण केला जातो. या दिवशी, कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून नवीन हंगामात चांगली मासेमारी होऊ दे आणि समुद्राला शांत कर अशी प्रार्थना करतात. आज ठाण्यामध्ये नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आमचा मच्छीमारी हा व्यवसाय चांगल्या प्रकारे व्हावा व आम्हाला सुख समृद्धी आणि भरभराट लाभो अशी प्रार्थना आगरी कोळी बांधवांनी केली आहे.












