Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडूंनी सांगितला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री
Top News

राजकारणात मोठी खळबळ! बच्चू कडूंनी सांगितला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री

Bachchu Kadu CM choice
52

Bachchu Kadu CM choice : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) पदी आल्यावर हमखास जनतेच्या (Maharashtra Politics) मनातील मुख्यमंत्री कोण? असा प्रश्न विचारण्यात येतो. आता त्यामागील भावना काय हे जनतेला आणि नेत्यांनाच ठाऊक. पण देवाभाऊंच्या काळात या मुद्दावरून मोठा गदारोळ उडालेला आहे. मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी यापूर्वी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहोत असा दावा केला होता. त्यावेळी यांच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. आता तसाच प्रकार पुन्हा समोर आला आहे. प्रहारमधून शिंदे सेनेत दाखल झालेले बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री म्हणून जनतेची पसंती कुणाला आहे, याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

हेही वाचा – “साहेब आता तुम्हीच काहीतरी करा…”, अजित पवार गटाच्या आमदारांचे शरद पवारांना फोन, महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होणार

एकनाथ शिंदे हे रात्री दोन वाजता सामान्यांसाठी दरवाजा उघडणारे नेते आहेत. त्यामुळे अशा ताकतीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री व्हावा. सध्या सर्वेक्षण जरी केले तरी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच व्हावेत. असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे देवाला सकाळी घालण्यापेक्षा आपण जनतेच्या पुढे जाऊन एकत्रित एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रार्थना करू असेही यावेळी बच्चू कडू म्हणाले. आमदार बच्चू कडू हे पंढरपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.

शिवसेनेला शेतकऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. विभागनुसार पीक पद्धती बदलत आहे. त्यामुळे विभागनुसार शिवसेनेने शेतकऱ्यांचे धोरण तयार केले पाहिजे. शिवसेनेने धोरण तयार केले तर त्या शेतकरी धोरणावर सरकारला कसे घेऊन जाता येईल. हे ठरवता येईल. असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिला आहे.

आमदार बच्चू कडू हे आज पंढरपुरात आले होते. पंढरपुरात आल्यावर आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी धोरणाविषयी बोलत असताना. शिवसेनेने शेतकरी धोरण स्पष्ट करावे अशी थेट आणि स्पष्ट मागणी केली आहे. तसेच, आपण आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठलाकडे इतकेच प्रार्थना केली आहे. की सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याप्रतीच्या भावना चांगल्या आल्या पाहिजेत. ही प्रार्थना असल्याचेही आमदार बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts