जळगावात विविध मागण्यांसाठी आणि लाडकी बहीण योजनेच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता, तसेच मोबाईल रिचार्जचा मोबदला मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी अंगणवाडी सेविकांनी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना घेराव घालत मागण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी आदिती तटकरे हाय हाय….मुंबईची बाहुली काय म्हणते…..या शब्दात घोषणाबाजी करत अंगणवाडी सेविकांनी मंत्री आदित तटकरे यांचा निषेध व्यक्त केला












