धान उत्पादकांचे चुकारे, बोनस, पीक नुकसानीची भरपाई आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी अशा मुद्द्यांवर सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. आमदार रामदास मसराम यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेतकरीही सहभागी झाले. आंदोलनकर्त्यांना SDO ऑफिस दारावर अडविल्यानंतर पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये थोडी बाचाबाचीही झाली.












