Dev Diwali lucky zodiac signs : देव दिवाळी हा सण हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण मानला जातो. कार्तिक पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. याच दिवशी देवता देखील पृथ्वीवर येऊन दिवे लावून दिवाळी साजरी करतात. या दिवशी पवित्र स्नान दान-धर्म दीपदान केल्याने पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होतं असं मानलं जातं. यंदाही दिवाळी पाच नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे.देव दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर देव दिवाळी काही राशींसाठी विशेष ठरणार आहे.
5 नोव्हेंबर हा दिवस काही राशींसाठी शुभ ठरणार आहे. कारण देव दिवाळीच्या पवित्र मुहूर्तावरच काही राशींवर नशिबाचा प्रचंड वरदहस्त असल्याचे पाहायला मिळेल. कारण या दिवशी सुरु होणारे ग्रह योगामुळे आर्थिक प्रगती, करिअरमध्ये यश आणि नवीन संधीचा वर्षाव काही राशींवर होऊ शकतो. जाणून घ्या कोणत्या आहेत या भाग्यवान राशी ज्यांना मिळेल नशिबाची साथ.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी देव दिवाळीचा हा सण उत्साहदायक असणार आहे. मेष राशीच्या व्यक्तींसोबत नशिबाची साथ कायम असेल. त्यामुळे कोणताही शुभकामाची सुरुवात उद्यापासून करू शकतात. या पवित्र दिवशी तुमच्याकडे नवीन प्रोजेक्ट येऊ शकतात. याशिवाय प्रगतीचे देखील योग जुळून येत आहेत. या दिवशी ग्रहांची स्थिती अनुकूल असल्या कारणाने तुम्हाला कोणतीही चिंता भासणार नाही.
सिंह
सिंह राशींच्या व्यक्तीसाठी देव दिवाळी चा पवित्र दिवस हा उत्तम ठरणार आहे. या काळात तुमच्या मनात असलेली इच्छाप्राप्ती होईल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल. तुमच्या आजूबाजूला सकारात्मक गोष्टींचा परिणाम दिसून येईल. तसेच मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.
मकर
मकर राशीसाठी उद्याचा दिवस भाग्यदायी असणार आहे. ज्या व्यक्तींना नोकरीमध्ये बदल करायचा असेल त्यांच्यासाठी हा उत्तम दिवस असून मेहनतीला चांगलं यश मिळेल. मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. उद्या तुमचा कामानिमित्त प्रवास उद्भवू शकतो. अनेक लोकांच्या भेटीगाठी होतील.
वृश्चिक
वृश्चिक राशीला भाग्यची साथ मिळणार आहे. कारण उद्याचा दिवस वृश्चिक राशींच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. तुमची नियोजित कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तर अनेक दिवसापासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. माता लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील.
मीन (Dev Diwali lucky zodiac signs)
मीन राशीच्या लोकांना उद्याचा दिवस लाभदायी ठरणार आहे. हा दिवस अनुकूल असेल. तुमच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक होईल. काही कारणास्तव तुमचे पैसे खर्च होऊ शकतात त्यामुळे पैसे जपून वापरा.












