त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरात सुरक्षारक्षकांनी वादातून भाविकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रावण महिन्यातील सलग सुट्ट्यांमुळे त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी होती; अचानक मुखदर्शन बंद झाल्याने वाद सुरू झाला. या वादात देवस्थान ट्रस्टच्या सुरक्षारक्षकांनी भाविकावर अरेरावी केल्याचा आरोप केला. सोशल मीडियावर या मारहाण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.












