Health Tips | सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक स्वत:कडे नीट लक्ष देत नाहीत. सकाळी उशीरा उठणे, रात्री उशीरा झोपणे किंवा अवेळी जेवण करणे अशा अनेक सवयी लोक आपल्या शरीराला लावून घेत असतात. यामध्ये बरेच लोक ऑफिसच्या कामाचा तणाव, घरातलं काम अशा अनेक गोष्टींमुळे उशीरा जेवण करत असतात. काहीजण तर मोबाईल पाहत किंवा टीव्ही पाहत उशीरा जेवत असतात. तर बऱ्याच लोकांना उशीर जेवण करण्याची सवय असते. पण उशीरा जेवण करण्याची हीच सवय शरीरासाठी घातक ठरू शकते.
हेही वाचा – Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा
उशीरा जेवल्यामुळे कोणते गंभीर आजार होतात?
रात्री उशीरा जेवण केल्यामुळे अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. उशीरा जेवण केल्यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे मग गॅस, अपचण, आंबट पित्त यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. तसेच हृदयरोग, मधुमेह यासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. सोबतच लठ्ठपणा देखील वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, आपल्या शरीरामध्ये एक नैसर्गिक जैविक घड्याळ असते जे आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. त्यामुळे आपण अवेळी जेवण करतो तेव्हा आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होतो आणि आजारांचा धोका निर्माण होतो.
बरेच लोक रात्री उशीरा जेवताना तळलेले पदार्थ, तिखट मसालेदार पदार्थ मोठ्या प्रमाणात खातात. यामुळे शरीरातील फॅट वाढण्यास सुरूवात होत, पित्ताचा त्रास होण्यास सुरू होतो, गॅस, अपचन सारख्या समस्या होण्यास सुरूवात होते.
तुमच्या रात्री उशीरा जेवण करण्याच्या सवयीमुळे अनेक आजार निर्माण होतातच पण सोबत काही कालांतराने त्याची लक्षणे देखील दिसायला सुरूवात होते. यामध्ये बऱ्याच जणांच्या छातीत झळझळ होण्यास सुरूवात होते, काही लोकांच्या पोटात गॅस होतो आणि पोट साफ होण्यास त्रास होतो. काहींना थकवा येण्यास सुरूवात होते. तर काहींना चक्कर येणे, मळमळ होणे, शरीर सुस्तावणे अशा समस्या देखील निर्माण होताना दिसतात.
जर तुम्हालाही अशा समस्यांपासून सुटका हवी असेल तर उशीरा जेवण न करता दररोज वेळेवर जेवण करा. झोपण्याच्या किमान दोन-तीन तास आधी रात्रीचे जेवण करा. यावेळी हलके आणि पौष्टीक अन्न खा यामुळे पचन, गॅससारखे त्रास होत नाहीत. तेलकट, मसालेदार पदार्थ खाणं टाळा. सोबतच नियमित वेळी झोपा आणि झोप पूर्ण घ्या जेनेकरूण पचनाच्या समस्या, लठ्ठपणा, गॅस, अस्वस्थपणा अशा अनेक समस्या कमी होण्यास मदत होईल.












