रत्नागिरीच्या मांडवी समुद्रकिनारी नारळी पौर्णिमेनिमित्त दर्या राजाला सोन्याचा नारळ वाहण्यासाठी सायंकाळी मोठी गर्दी झाली. किनारपट्टी भागातील या परंपरेनुसार यंदाही जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत पोलिस दलाने नारळ अर्पण केला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात शेकडो भाविकांनी सणाचा आनंद लुटला.












