ग्रेटर नोएडा मध्ये तब्बल ३६ लाख रुपयांच्या हुंड्याचा मागणीसाठी पती व सासरच्यांनी तरुणीला पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली. निक्की हिचा विवाह २०१६ मध्ये विपिन याच्यासोबत झाला होता. सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओंमध्ये मारहाणीचे आणि निक्की जळत जिना उतरत असल्याचे दृश्य दिसत आहेत. गंभीर भाजल्याने निक्कीचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. पोलिसांनी पतीला अटक केली असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे












