धाराशिव जिल्ह्यात उमरगा शहरातील जुना सरकारी दवाखाना येथे शेतकऱ्यांनी आणलेला भाजीपाला व फळे यांचा गटारीतील पाण्यात ठेवून लिलाव होतो. लिलावात घेतलेला भाजीपाला व फळे व्यापारी उमरगा शहरातील नागरिकांना विकतात. परंतु गटारीतील पाणी हे दूषित असते त्यामुळे जंतू व रोगराई फळे व भाजीपाल्यातून उमरगाकरांना भेटते त्यामुळे भविष्यात उमरगेकरांचा आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. आता याच भाजीपाला व फळ मार्केट येथे सुविधा उपलब्ध करून द्यावी यासाठी एक सप्टेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.












