हिंगोलीच्या कळमनुरी शहरात सार्वजनिक स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या नाल्याला पावसामुळे पाणी आलं आणि पूल नसल्यामुळे गुडघाभर पाण्यातून चालत प्रेतयात्रा घेऊन जावी लागली. या भागातील नागरिकांनी अनेकदा या नाल्यावर पूल बांधण्याची व चांगला रस्ता बांधण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.












