बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशी याची पार्किंगच्या वादातून हत्या झाली. निजामुद्दीन परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या हल्ल्यात आसिफचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली असून हत्यार जप्त केले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.












