नाशिकमधील जॉगर्स पार्क समोर काही जिलेटिनच्या कांड्या आढळल्या. पोलिसांनी घटनास्थळी ताबडतोब धाव घेतली, तर बॉम्बशोधक पथकाने तपास केला. पाण्याचा प्रयोग केल्यानंतर कांड्या एक्सपायर असल्याचे समोर आले. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.












