केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत 3 विधेयक सादर केलीत. परंतु या तिन्ही विधेयकावरून लोकसभेत प्रचंड गोंधळ उडाला आहे. खासदारांनी तिन्ही विधेयकाच्या प्रती फाडून थेट अमित शहांच्या अंगावर फेकल्या. गुन्हेगारी प्रकरणात पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना अटक झाल्यास पदावरून काढून टाकण्याचा सरकार कायदा करणार आहे. या प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.












