बारामतीतील वडगाव निंबाळकर येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघाताने खिल्लारे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात शुभम गोरख खिल्लारे या उच्चशिक्षित युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.












