चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा खुन झाल्याची घटना घडताच त्याचा उलगडा पोलिसांकडून 48 तासांत करण्यात आला. फिरण्याच्या आवडीचा गैरफायदा घेत टॅव्हल एजंट जयेश गोंधळेकर आणि एका साथीदाराने दागिने व पैशासाठी खून केला. जयेश अटकेत असून साथीदार फरार आहे; चोरीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.












