कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. असे असतानाच नवजात बालकाला जन्म झाल्या झाल्या डोळे मिटावे लागले. या नवजात बालकाचा मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली असून या बाळाच्या आईला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले असून त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरु आहेत.












