ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर करण्यात आलेल्या पुणे येथील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ओबीसी बांधव आक्रमक झाले आहे. यावेळी आंदोलकांनी लक्ष्मण हाके तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्यात. शेकडोंच्या संख्येने ओबीसी बांधव आंदोलनात सहभागी झाले आहे.