रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव तालुक्यात आज दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन भक्तिभावात पार पडले. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. ढोल-ताशांच्या गजरात, गुलाल उधळून आणि जल्लोषाच्या वातावरणात भाविकांनी बाप्पाला निरोप दिला, तर अनेकांच्या डोळ्यांत अश्रूही दाटून आले.












