Pakistan false claim Rafale pilot Shivangi Singh : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी अंबाला एअरबेसवर स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग यांची भेट घेतली, जिथं राष्ट्रपतींनी राफेल लढाऊ विमान यशस्वीरित्या उडवले. हे लक्षात घ्यावं की पाकिस्ताननं शिवांगी सिंगबद्दल अनेक चुकीची माहिती पसरवली होती. ऑपरेशन सिंदूर दरम्यान, त्यांनी भारतीय राफेल लढाऊ विमान पाडल्याचा आणि एका पायलटला ताब्यात घेतल्याचा दावा केला होता आणि सोशल मीडियावर पायलट शिवांगी सिंगला पकडल्याचे खोटे वृत्त देखील पसरवले गेले होते. आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शिवांगी यांची भेट घेतली आणि पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड केला.
कोण आहे शिवांगी सिंग
स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग ही पहिली महिला राफेल पायलट आहे. तिला 2015 मध्ये फायटर पायलट रँकमध्ये नियुक्त करण्यात आलं. ती फ्रेंच बनावटीची सिंगल-सीटर राफेल लढाऊ विमान उडवणारी पहिली भारतीय महिला आहे. तिनं जवळजवळ दोन दशकं हवाई दलात उत्तम कामगिरी केली आहे. तिचे पती देखील फायटर पायलट आहेत.
President Droupadi Murmu took a sortie in a Rafale aircraft at Air Force Station, Ambala, Haryana. She is the first President of India to take sortie in two fighter aircrafts of the Indian Air Force. Earlier, she took a sortie in Sukhoi 30 MKI in 2023. pic.twitter.com/Rvj1ebaCou
— President of India (@rashtrapatibhvn) October 29, 2025
राष्ट्रपती मुर्मू यांनी राफेल लढाऊ विमानातून केलं उड्डाण
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज हरियाणातील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावरून राफेल लढाऊ विमानातून उड्डाण केलं. एअर चीफ मार्शल ए.पी. सिंग यांनीही त्याच हवाई तळावरून स्वतंत्र विमानातून उड्डाण केलं. राफेल विमानात चढण्यापूर्वी राष्ट्रपतींनी जी-सूट परिधान केला. हेल्मेट घालून आणि सनग्लासेस घालून मुर्मू यांनी पायलटसोबत फोटो काढला.
राष्ट्रपतींना गार्ड ऑफ ऑनर Pakistan false claim Rafale pilot Shivangi Singh
सकाळी 11:27 वाजता विमानानं उड्डाण करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी विमानाच्या आतून अभिवादन केलं. आज सकाळी हवाई दलाच्या तळावर आगमन झाल्यानंतर राष्ट्रपतींना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देखील देण्यात आला. 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून सुरु करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने राफेल लढाऊ विमानांचा वापर केला







