उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं, अशी पोस्ट शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी ‘एक्स‘ या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट केली आहे. मुद्रांक शुल्क (stamp duty) म्हणून केवळ 500 रुपये मोजल्याचा दावाही दानवे यांनी केला. मुळ मालकांना विश्वासात न घेता, साताबारा क्लिअर नसताना हा सर्व व्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या दाव्याने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
गंमत तर पुढे आहे. एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल!
हेही वाचा – हरियाणामध्ये 25 लाख मतं चोरीला, दर आठ मतदारांपैकी एक बनावट; राहुल गांधींचा गंभीर आरोप
फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या..
दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा.. कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त ५०० रुपये.. फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र! असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत, स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये
राज्यात काय परिस्थिती आहे? देवभाऊ म्हणावं की त्यांना मेवाभाऊ म्हणावे? अशी टीका त्यांनी केली. मुरलीधर मोहळ जैन बोर्डिंगची जमीन घेतायत, अजित पवार यांचे चिरंजीव दोन दिवसात जमीन घेतात. अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीत घेतात आणि त्याला स्टॅम्प ड्यूटी पाचशे रुपये लागते. इकडे अजित पवार शेतकऱ्यांना म्हणतात तुम्हाला सगळं फुकट लागतं, मग तुम्हाला का जमीन फुकट लागते, असा टोमणा दानवेंनी लगावला. भू संपादन झालेली जमीन परत कशी मिळते. महार वतनाची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीला कशी मिळते. कोणता नियम पार्थ पवार यांनी पाळला, सर्व खुलासा पार्थ पवार यांनी करावा. अशी मागणी दानवे यांनी केली.
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार..
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार.. पण पोराच्या १ हजार ८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ ! ही माफी फुकट नव्हती का?, असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
शेतकऱ्यांना “सारखं फुकट, सारखं माफ लागतं” म्हणणारे अजित पवार —
पण पोराच्या १८०४ कोटींचे डील. त्यावर १२६ कोटींची स्टँप ड्यूटी होते , हे डील ३०० कोटीचे दाखवून, त्यावरचे २१ कोटी देखील माफ !
ही माफी फुकट नव्हती का? pic.twitter.com/3YJuXiWPd8
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 5, 2025









