पुणे महानगर परिवहन महामंडळाने स्वमालकीच्या बस रस्त्यात बंद पडल्यास संबंधित देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांच्यावर आर्थिक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, बस बंद पडल्यास दोघांच्या पगारातून अर्ध्या दिवसाचे वेतन कमी करण्यात येईल. यासंदर्भात पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी आदेश दिले आहेत. यामुळे कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, या निर्णयावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.












