इंदापुरातील छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी आणि समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्ग हिंगणगाव येथे तासभराहून अधिक काळ रास्ता रोको करण्यात आला. आमदार महेशदादा लांडगे आणि शिवभक्तांनी सुशोभीकरणाचे काम थांबवण्याची मागणी केली; अखेर प्रशासनाने नमत घेत चालू असणारं काम थांबवण्याचे आदेश दिल्याची माहिती आमदार महेशदादा लांडगे यांनी दिली आहे.












