रायगड जिल्ह्यातील साखर सुतारवाडी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त आत्मदहनाचा इशारा देताच, तातडीने तहसील कार्यालयात ग्रामस्थांची प्रशासनासोबत बैठक झाली. मात्र समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने ग्रामस्थांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्तक्षेपाने दरडग्रस्त अनुदान २.३० लाखावरून १२.३० लाखांवर वाढवण्यात आले. तसेच संपूर्ण गावाचे पुनर्वसन पुढील वर्षभरात होईल या खात्रीशीर आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आत्मदहन आंदोलन मागे घेतले.












