यूट्यूबर एल्विश यादवच्या गुरुग्राम येथील घरावर अज्ञात मुखवटेधारी हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. यूट्यूबर एल्विशच्या घरावर अज्ञात हल्लेखोरांनी १५ गोळ्या झाडल्या आहे. सुदैवाने एल्विश विदेशात असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, फक्त केअरटेकर घरात होता. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.












