गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी,नाले तुडुंब भरून वाहताना नाला ओलांडण्याच्या प्रयत्नात एका अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पेरमिली केंद्रातील शिक्षकाचा जीव गेल्याची दुःखद घटना समोर आली आहे. असन्तु सोमा तलांडी असे त्या शिक्षकाचे नाव आहे. १८ ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यावर असन्तु हे सायंकाळी गावाकडे निघाले होते. १९ ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास सिपनपल्ली नाल्यात अज्ञात मृतदेह आढळला.












