Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • जोरदार वाढीसह शेअर बाजार बंद; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 182 वाढीसह बंद
ताज्या बातम्या

जोरदार वाढीसह शेअर बाजार बंद; सेन्सेक्स 609 तर निफ्टी 182 वाढीसह बंद

stock market surge profitable shares
61

Today Stock Market : भारतीय शेअर बाजार आज पुन्हा एकदा जोरदार वाढीसह बंद झाला. बुधवारी बीएसई सेन्सेक्स 609.45 अंकांनी वाढून 77,496.36 अंकांवर तर एनएसई निफ्टी 50 निर्देशांक देखील 181.95 अंकांनी वाढून 24,177.65 अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे आज सेन्सेक्स एकवेळ 1000 अंकाहून वाढून 77,982.51 वर अंकांवर पोहोचला होता. या आठवड्याच्या पहिल्या तीन सत्रांपैकी दोन सत्रांमध्ये बाजार तेजीसह बंद झाला, तर मंगळवारचं सत्र घसरणीसह संपलं, हे विशेष.

हेही वाचा : मस्साजोग पोटनिवडणूक निकाल जाहीर; स्वरूपानंद देशमुख विजयी, अश्विनी देशमुखांचा 92

आयटीसी शेअर्समध्ये जोरदार वाढ :

आज, सेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्स तेजीसह बंद झाले, तर उर्वरित 8 शेअर्स घसरणीसह बंद झाले. दरम्यान, निफ्टी 50 मधील 50 पैकी 35 शेअर्स वाढीसह तर उर्वरित 15 शेअर्स घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्समधील शेअर्समध्ये, आयटीसीच्या शेअर्सनी आज 3.86 टक्क्यांची सर्वाधिक वाढ नोंदवली. तर इंडिगोच्या शेअर्समध्ये आज 2.36 टक्क्यांची सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली.

या शेअर्समध्ये दिसून आली मोठी वाढ :

सेन्सेक्समधील इतर शेअर्सपैकी, टेक महिंद्रा 3.14 टक्के, मारुती सुझुकी 2.82 टक्के, रिलायन्स इंडस्ट्रीज 2.68 टक्के, भारती एअरटेल 2.30 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.04 टक्के, सन फार्मा 1.79 टक्के, एल अँड टी 1.45 टक्के, अदानी पोर्ट्स 1.40 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 1.30 टक्के, इन्फोसिस 1.29 टक्के, टीसीएस 1.17 टक्के, बजाज फायनान्स 1.00 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.98 तर इटरनल 0.10 टक्के वाढीसह बंद झाले.

कोणत्या कंपन्यांचे शेअर्स घसरले :

बुधवारी, एनटीपीसीचे शेअर्स 1.33 टक्क्यांनी, बजाज फिनसर्व्हचे 0.85 टक्क्यांनी, आयसीआयसीआय बँकेचे 0.83 टक्क्यांनी, एशियन पेंट्सचे 0.62 टक्क्यांनी, ट्रेंटचे 0.62 टक्क्यांनी, एचडीएफसी बँकेचे 0.45 टक्क्यांनी आणि एसबीआयचे 0.41 टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts