चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील टेकरी नदीत पोहायला गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जित वाकडे आणि आयुष गोपाले अशी मृतांची नावे आहेत.शालेय सुट्टीचा दिवस असल्याने सिंदेवाही येथील काही मुले पोहण्यासाठी टेकरी गावाजवळील नदीघाटावर गेली होती. त्यावेळी जित वाकडे आणि आयुष गोपाले हे दोघे नदीच्या पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलवले.












