बार्शी-सोलापूर मार्गावर आगळगाव येथील चांदणी तलावाला पुराचा तडाखा बसला. यामुळे आसपासच्या सहा गावांचा संपर्क तुटला आहे. या भागात ये-जा करणाऱ्या एसटी बस ठप्प झाल्यामुळे प्रवाशांसह, विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. आगळगावसह कळंबवाडी, भानसोळी, उमरगे आदी गावांचा या पुरामुळे संपर्क तुटला असून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.












