वाशिम जिल्ह्यातील अकोला-नांदेड महामार्गावर सोया फॅक्टरीजवळ भरधाव कंटेनरने दुचाकी आणि कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली. दरम्यान, पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे.












