मुलांना कडेवर घेऊन पाण्यातून शाळेत पोहोचवावं लागत असल्याची परिस्थिती तुळजापूर येथील बारूळ गावात पाहायला मिळत आहे. बोरी नदीवरील या पुलाचे काम व्हावे यासाठी गावकरी पाच ते सहा वर्षांपासून मागणी करत असूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बोरी नदीवरील पुलाची उंची वाढवली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. प्रशासनाने या पुलाच्या उंची वाढविण्याच्या कामाकडे आतातरी लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांमधून मागणी होत आहे.












