रत्नागिरीहून मुंबईकडे जाणाऱ्या मांडवी एक्सप्रेसमधून कोलाड ते रोहा दरम्यान महिला पडल्याची धक्कादायक घटना घडली. कोलाड पोलीसांना माहिती मिळताच SVRSS टीमने तत्काळ शोधमोहीम राबवली. गोवे गावच्या हद्दीत महिलेचा मृतदेह आढळून आला असून पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. त्या महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलीस चौकशी सुरु आहे.












