दहशतवाद, युद्ध आणि हिंसेच्या विरोधात वर्ध्यात “विश्व शांती प्रार्थना व पदयात्रा”चे आयोजन करण्यात आलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून गांधी पुतळ्यापर्यंत काढलेली पदयात्रा आणि सर्वधर्मीय प्रार्थनेतून मानवतेचा संदेश देण्यात आला. देशभरातून आलेल्या सेवाग्रामी सदस्यांनी गांधी विचारांचा गजर केला.
(RNO)












