सातारा शहरातील मंगळवार तळे परिसरात युवकाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना नुकतीच घडली आहे.
युवकाने घरातील किरकोळ वादातून हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करीत आहेत












