Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • “ते वेदनादायक आणि अस्वस्थ करणारे आहे” भूमी पेडणेकरच्या या वाक्याने प्रश्नांना उधाण,पण नेमकं “एक्झिमा” म्हणजे काय? लक्षण कोणती? उपाय काय? जाणून घ्या
लाईफस्टाईल

“ते वेदनादायक आणि अस्वस्थ करणारे आहे” भूमी पेडणेकरच्या या वाक्याने प्रश्नांना उधाण,पण नेमकं “एक्झिमा” म्हणजे काय? लक्षण कोणती? उपाय काय? जाणून घ्या

आपल्यापैकी अनेकांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. अनियमित आहार, त्वचेची नीट काळजी घेणे, या आणि अशा अनेक कारणांमुळे आपल्याला त्वचेच्या समस्या भेडसावत असतात. त्वचेच्या समस्यांमधील एक समस्या म्हणजे “एक्झिमा” . आपल्यापैकी अनेकजण एक्झिमाशी ग्रस्त असतात. सिनेअभिनेत्री भूमी पेडणेकरही यातून वाचली नाही. भूमी देखील एक्झिमाने त्रस्त आहे. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे, एक्झिमाशी असलेल्या तिच्या संघर्षाबद्दल उघडपणे सांगितले. भूमी पेडणेकरने सांगितले की तिला लहानपणापासूनच या समस्येचा सामना करावा लागत आहे आणि फक्त तीन वर्षांपूर्वीच तिला या आजाराचे निदान झाले.

भूमीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये ती बाथरूममध्ये मेकअप करताना दिसली तेव्हा तिने तिचा एक्झिमा वाढल्याचे दाखवले – ज्याचे कारण तिने जास्त प्रवास, अस्वस्थ आहार आणि ताणतणाव असे दिले, आहे. यावेळी तिने म्हंटले,”तर जेव्हा जेव्हा मी प्रवास करते, किंवा माझा आहार योग्य नसतो, किंवा मी तणावग्रस्त असते – सर्व समस्यांचे मूळ कारण – तेव्हा माझा एक्झिमा भडकतो. ते खूप निराशाजनक आहे, कारण ते वेदनादायक आणि अस्वस्थ आहे. मी लवकरच याबद्दल अधिक बोलेन. तसेच, या बाथरूममधील प्रकाश”, असे तिने म्हटले.

तर याचमुळे आज पण हे जाणून घेऊयात कि,एक्झिमा म्हणजे नक्की काय? त्याची लक्षणे कोणती? आणि त्यावर उपाय काय?

एक्झिमा म्हणजे काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, एक्झिमा, ज्याला एटोपिक डर्माटायटीस म्हणून देखील ओळखले जाते, ही एक त्वचेची स्थिती आहे, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटते. जरी ही एक सामान्य स्थिती असली तरी ती संसर्गजन्य नाही.

राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) याबाबत म्हणते की, बाह्य आणि अंतर्गत दोन्ही घटक एक्झिमा भडकण्यास कारणीभूत ठरू शकतात, ज्यामध्ये रसायने, सुगंधित उत्पादने, सिगारेटचा धूर, ऍलर्जी, काही विशिष्ट कापड, घाम येणे, हवामानातील बदल, ताणतणाव, अन्नाची ऍलर्जी, काही श्वसन संक्रमण आणि प्राण्यांचा कोंडा यांचा समावेश आहे. या सर्व घटकांमुळे एक्झिमा भडकण्यास कारणीभूत ठरतात.

हे ही वाचा :

“डियर रावण…”, सिमी गरेवालच पारंपरिक विचारधारेच्या उलट ट्विट

एक्झिमाची लक्षणे

हेल्थलाइनच्या मते, एक्झिमाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे खाज सुटणे, त्वचा कोरडी, खडबडीत, फ्लॅकी होणे, सूज येणे हि आहेत. या स्थितीच्या इतर लक्षणांमध्ये तीव्र खाज सुटणे, लाल किंवा तपकिरी ठिपके, लहान फोड येणे, खवलेयुक्त त्वचा आणि कच्ची त्वचा यांचा समावेश आहे.

वर उल्लेख केलेल्या घटकांमुळे एक्झिमा भडकू शकतो, त्यामुळे ही लक्षणे जाणवणाऱ्यांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

एक्झिमाचा उपाय

एक्झिमावर कोणताही कायमस्वरूपी उपाय नसला तरी, त्वचेला ओलावा देऊन, मॉइश्चरायझर वापरून आणि ओटमील लोशन, कोरफड, नारळाचे तेल यांसारख्या नैसर्गिक उपायांचा वापर करून ही लक्षणे नियंत्रित करता येतात. एक्झिमाची लक्षणे कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेही महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्वचेचा संसर्ग टाळता येईल आणि योग्य उपचाराने आराम मिळेल.

घरगुती आणि नैसर्गिक उपाय:

  • त्वचेला ओलावा द्या:
    आंघोळीनंतर लगेच त्वचेवर मॉइश्चरायझर लावा जेणेकरून त्वचेतील ओलावा टिकून राहील.
  • कोरफड:
    कोरफडीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेचा संसर्ग रोखण्यास मदत करू शकतात.
  • कोलाइडल ओटमील:
    हे लोशन त्वचेतील कोरडेपणा, खाज आणि भेगा कमी करण्यास मदत करते.
  • नारळाचे तेल:
    नारळाच्या तेलातील फॅटी ऍसिड त्वचेला ओलावा देऊन आराम देतात.

एक्झिमा असेल तर काय टाळावे?

  • अति गरम पाणी:
    अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास त्वचा कोरडी होऊन एक्झिमाची लक्षणे वाढू शकतात, त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा.
  • कडक साबण:
    त्वचेला जास्त कोरडे करणाऱ्या साबणांचा वापर टाळावा.

डॉक्टरांचा सल्ला का घ्यावा?

  • एक्झिमा एक जुनाट आजार आहे, जो वेळेनुसार वाढू शकतो आणि परत येऊ शकतो.
  • डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एक्झिमासाठी योग्य उपचार घ्यावा, जेणेकरून लक्षणे नियंत्रणात राहतील आणि त्वचेला इजा होणार नाही.

एक्झिमा आणि इतर गोष्टी:

  • काहीवेळा एक्झिमा दम्यासारख्या ऍलर्जिक स्थितींशी संबंधित असू शकतो.
  • एक्झिमावरील उपचार खाज कमी करण्यासाठी आणि त्वचेला आराम देण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts