Breaking News :
लाईफस्टाईल

वय वाढलं तरी चेहरा चमकेल! फक्त 4 घटकांतून तयार करा ‘DIY बोटॉक्स जेल’

DIY Botox Gel and Natural Skin Care Tips
76
DIY Botox Gel and Natural Skin Care Tips: तुमचा चेहराही काळवंडलेला दिसतोय आणि महागडी क्रीम्स वापरूनही काही फरक जाणवत नाही का? मग एक्सपर्टने सांगितलेले फक्त 4 घटक वापरून DIY बोटॉक्स जेल तयार करा आणि काही दिवसांतच दिसणारा बदल अनुभवून पहा. चला तर जाणून घेऊया ही सोपी रेसिपी

बदलत्या जीवनशैलीत त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक जण महागड्या कॉस्मेटिक ट्रीटमेंट्सचा आधार घेतात. मात्र प्रसिद्ध ब्युटी एक्सपर्ट यांनी घरच्या घरी तयार करता येणाऱ्या नैसर्गिक स्किन केअर (Natural Skin Care) जेलची सोपी पद्धत सांगितली आहे. हे जेल त्वचेला तजेला देण्यासोबतच नैसर्गिक चमक वाढवण्यास (Glowing Skin) मदत करते.

त्यांच्या मते, त्वचेच्या अनेक समस्या किचनमधील सध्या घटकांमधूनही सोडवता येतात. योग्य पद्धतीने वापर केल्यास हे घटक त्वचेला टाइटनेस देणे, बारीक रेषा कमी करणे आणि हेल्दी ग्लो देणे यासाठी उपयुक्त ठरतात. (Homemade Botox Gel)

हेही वाचा : बाप्पांच्या आगमनाची तारीख ठरली! गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत जाणून घ्या संपूर्ण उत्सवाचे वेळापत्रक

साहित्य

या नैसर्गिक ग्लो जेलसाठी चार मुख्य घटक लागतात:

लवंग (8 ते 10) (Clove for Skin)

तेजपत्ता (Bay Leaf for Skin)
शुद्ध बदाम तेल (Almond Oil for Skin)
ताजे एलोवेरा जेल (Aloe Vera Gel)

जेल कसे तयार करावे? ( DIY Botox Gel)

सर्वप्रथम लवंग आणि तेजपत्ता एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक पावडर तयार करा किंवा कुटून घ्या. यानंतर १५० मिली पाणी (RO किंवा मिनरल वॉटर) घ्या आणि त्यात लवंग- तेजपत्त्याचे मिश्रण टाकून उकळा, जोपर्यंत पाण्याचा रंग बदलत नाही. (Glowing Skin Tips)

त्यानंतर हे पाणी थोड्या प्रमाणात एका भांड्यात घ्या. जास्त प्रमाणात पाणी वापरू नाक, कारण याला जेलमध्ये रूपांतर करायचे आहे. त्यात ताजे एलोवेरा जेल घालून चांगले मिसळा. Ls Marathi News Channel 

यानंतर 1 ते 1.5 चमचा बदाम तेल घालून मिश्रण पुन्हा एकदा नीट ढवळा. काही मिनिटांत हे मिश्रण जेल स्वरूपात तयार होते. तयार झालेले जेल एअरटाइट डब्यात साठवून ठेवा. (Home Remedies for Skin)

वापरण्याची पद्धत

रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर या जेलचे काही थेंब चेहऱ्यावर लावा. हलक्या हाताने 30 ते 50 सेकंद मसाज करा. नियमित वापर केल्यास त्वचा अधिक मऊ आणि उजळ दिसू शकते. (Beauty Tips)

फायदे

त्वचेला नैसर्गिक टाइटनेस मिळण्यास मदत

फाइन लाईन्स कमी होण्यास सहाय्य

त्वचा शांत आणि ताजीतवानी राहते

बदाम तेलामुळे खोलवर पोषण मिळते

सकाळी चेहरा अधिक फ्रेश आणि ग्लोइंग दिसतो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts