Tamannaah Bhatia Beauty Secret: बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना पिंपल्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्हीही चेहऱ्यावरील पिंपल्समुळे त्रस्त असाल, तर अभिनेत्री तमन्ना भाटियाने सांगितलेल्या या खास स्किन केअर टिप्स नक्की जाणून घ्या.
बदलत्या लाइफस्टाइलमुळे आजकाल टीनएजमध्येच चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या जाणवू लागते. त्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो कमी होतो आणि अनेकदा आत्मविश्वासावरही परिणाम होतो.
जर तुम्हीही पिंपल्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल, तर अभिनेत्री तमन्ना भाटियाने सांगितलेले हे खास स्किन केअर सीक्रेट जाणून घ्या. तिच्या या टिप्स आजपासून तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता.
बॉलिवूड आणि साऊथ इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia Beauty Secret) आपल्या फिटनेससोबतच तिच्या नैसर्गिक सौंदर्यासाठीही ओळखली जाते. तिची चमकदार आणि निरोगी त्वचा पाहून अनेकांना तिच्या स्किन केअरबदल जाणून घेण्याची उत्सुकता असते.
एका मुलाखतीमध्ये तमन्नाने तिच्या त्वचेची काळजी घेण्याच्या सवयींबद्दल माहिती दिली. यावेळी तिने पिंपल्सच्या समस्येसाठी ती कोणता उपाय करते, याबाबत तिचा वैयक्तिक अनुभव शेअर केला.
हेही वाचा: पेपरफुटी प्रकरणांवर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले? वाचा
पिंपल्ससाठी तमन्नाचा खास उपाय
तमन्नाने सांगितले की, पिंपल्सची समस्या तिलाही कधी कधी होते, अशावेळी ती सुरुवातीच्या काळात काही साधे घरगुती उपाय करून पाहते. तिने एका मुलाखतीती सांगितलेल्या उपायांमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले.
तिच्या म्हणण्यानुसार, सकाळी उठल्यानंतर ब्रश करण्यापूर्वी तोंडातील लाळ ती पिंपल्सवर लावते. हा तिचा वैयक्तिक अनुभव असून, प्रत्येकाच्या त्वचेसाठी हा उपाय प्रभावी ठरेलच असे नाही.
तज्ज्ञांच्या मते, पिंपल्सची समस्या गंभीर असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तमन्नाची डेली स्किन केअर सवय (Tamannaah Bhatia Beauty Secret)
तमन्ना आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करते. सकाळी ती चेहरा स्वच्छ करून त्वचेला हायड्रेशन देण्यासाठी टोनर आणि मॉइश्चरायझरचा वापर करते.
मेकअप करताना योग्य प्रोडक्ट्स निवडणे आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील सर्व मेकअप पूर्णपणे काढणे यावर ती विशेष भर देते.
सुंदर त्वचेसाठी फक्त प्रोडक्ट्स पुरेसे नाहीत
तसेच पुढे तमन्ना सांगते की, चांगली त्वचा मिळवण्यासाठी केवळ महागडे स्किन केअर प्रोडक्ट्स वापरणे पुरेसे नाही. शरीराची आतून काळजी घेणेही तितकेच महत्वाचे आहे.
योग्य संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि तणाव कमी ठेवणे याचा त्वचेवर सकारात्मक परिणाम होतो.
दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेतल्याने आणि योग्य जीवनशैली ठेवून त्वचा अधिक निरोगी राहण्यास मदत होते.
याच सवयींमुळे त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.









