चंद्रपूर जिल्ह्यातील देवाडा आणि पाचगाव येथील दोन वेगळ्या घटनांमध्ये वीज कोसळून युवक आणि जनावरांचा मृत्यू झाला. देवाडात विजय जंगू मंडाळी हा युवक शेतात काम करत असताना वीज पडून मृत झाला. दुसऱ्या घटनेत पाचगाव येथील चंद्रभान चौधरी यांच्या शेतात बैलावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनांनी गावात शोककळा पसरली आहे.