सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशाची स्थापना होत असतांना, शिर्डीच्या साई मंदिरात देखील विघ्नहर्ता गणरायाची प्रतिमा ठेवून त्याची विधिवत पूजा करण्यात आली. शिर्डी साईबाबा मंदिरात गणेशाचे आगमन झाल्याने भक्तीचा अनोखा संगम पहायला मिळत असून साईसमधीवर समोर विघ्नहर्ताची पूजा करून शिर्डीत श्रीगणेश उत्सवाची सुरुवात झाली आहे.